Subscribe Us

header ads

May 2 - Day of Special (Dinvishesh) मे 2 : दिनविशेष

May 2 - Day of Special (Dinvishesh)

मे 2 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

ध्वज दिन : पोलंड.
शिक्षक दिन : ईराण.
शिक्षण दिन : ईंडोनेशिया.

2 मे 1908 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

2 मे 1918 रोजी जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

2 मे 1921 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी

2 मे 1945 रोजी दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

2 मे 1994 रोजी "बँक ऑफ कराड" चे "बँक ऑफ इंडिया" मधे विलिनीकरण झाले. बँक ऑफ कराड ची स्थापना 1946 मध्ये झाली होती.


X X
2 मे 1994 रोजी नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

2 मे 1997 रोजी टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

2 मे 1997 रोजी राष्ट्रीय "अ" बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने "इंटरनॅशनल मास्टर" किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
                अभिजित कुंटे


2 मे 1999 रोजी कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.

2 मे 1999 रोजी मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

2 मे 2004 रोजी एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
X X

2 मे 2011 रोजी अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

2 मे 2012 रोजी नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात 120 मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

द स्क्रीम

                              एडवर्ड माँच

2 मे 1898 रोजी मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी चित्रपट दिग्दर्शक चित्रपट निर्मिती पटकथा लेखक भालजी पेंढारकर उर्फ भालचंद्र गोपाळ पेंढारकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू 26 नोव्हेंबर 1994 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर झाला. बभालाजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञान घडवणारी एक मोठी कार्यशाळा होती त्याचा संच म्हणजे कुटुंब होते. शिस्तबद्धता वेळ पत्रकानुसार काम कामाचे नेटके वाटप प्रार्थना दिनक्रम वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्य होती. बहिर्जी नाईक नेताजी पालकर मोहित्याची मंजुळा यातील संवादामधून भालजींनी दुबळेपणा व लाचारी विरुद्ध शाब्दिक असूड ओढले होते. सुलोचना चंद्रकांत मांढरे जयश्री गडकर असे अनेक कलाकार त्यांनी घडवले. महात्मा गांधीजींच्या 1948 मध्ये झालेल्या हत्यानंतर जी दंगल उसळली त्या दंगलीमध्ये जयप्रभास कोल्हापूर मधील त्यांचा जयप्रभास स्टुडिओ जाळला गेला त्यांनी तयार केलेला मीठ भाकर व बाळ गजबराचा मेरे लाल हे चित्रपट अजित भस्म झाले. त्याकाळी दीडशे ते 200 कामगार बेरोजगार झाले त्यामुळे लाखो रुपये खर्च करून त्यांनी पुन्हा जयप्रभास स्टुडिओ उभा केला आणि चित्रपट निर्मिती केली.



2 मे 1920 रोजी शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 जुलै 1983 मध्ये झाला.


2 मे 1921 रोजी ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म झाला.23 एप्रिल 1992 रोजी सत्यजित रे भारतीय चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न यांचे निधन झाले. "पथेर पांचाली" या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता.
                    सत्यजित रे 


2 मे 1922 रोजी भारतीय इंग्लिश बिलियर्डस व्यावसायिक खेळाडू विल्सन लिओनेल गार्टन-जोन्स यांचा जन्म झाला.

2 मे 1929 रोजी भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जुलै 1972 मध्ये झाला.

X X
2 मे 1969 रोजी ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा डावखुरा फ़लंदाज यांचा जन्म झाला.

                  ब्रायन लारा


2 मे 1972 रोजी स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म झाला.


2 मे 1519 रोजी लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार संशोधक त्यांचे निधन झाले.


             लिओनार्डो दा व्हिन्ची

2 मे 1686 रोजी शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते यांचे निधन झाले.

2 मे 1963 रोजी महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 882 मध्ये झाला.

X X
2 मे 1973 रोजी दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत यांचे निधन झाले.

2 मे 1975 रोजी शांताराम आठवले चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1910 मध महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे वडील ग्वालेर संस्थांच्या सरदार शितोळ्यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचे शिक्षण पुण्यातील भावे प्रशाळेत झाले. त्यांचा चुलत भाऊ गंधर्व नाटक मंडळीत अभिनय करत असल्यामुळे नाटक बघण्यासाठी त्यांनी नाट्यसृष्टीशी जवळून परिचय झाला. शितोळे यांच्या पुण्यातील वाड्यावर शाहिरी व लावणीच्या कार्यक्रमामुळे लोकहितांचा संस्कार त्यांच्यावर त्या काळात झाला. 1928 मध्ये शालांत परीक्षेत गणित विषयात ते नापास झाले. आणि 1929 मध्ये पक्षघाताच्या आजाराने वडिलांचे निधन झाले. 1930 मध्ये शालांत परीक्षेत बसून पुन्हा ते उत्तीर्ण झाले त्यानंतर वर्षभर ते महाविद्यालयात गेले. 1931 मध्ये त्यांचे कुटुंब पुण्याहून थेऊर जवळ असलेल्या कोळवाडी या ठिकाणी आले त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे कौटुंबिक आपत्तीमुळे सोडले. नारायण हरी आपटे यांच्या मधुकर मासिकाला आणि श्रीनिवास मुद्रालयाचे काम पाहण्यासाठी सहाय्यक म्हणून शांताराम कोरेगावला आले. आणि त्यांच्या कविता मधुकर मासिका मध्ये छापल्या जात असत. आपटे यांच्या शिफारसी मुळे अमृत मंथन या बोल पटाचे गीत लेखनाचे काम त्यांना मिळाले आणि अशा रीतीने शांताराम आठवले प्रभात मध्ये सहाय्यक म्हणून एक जानेवारी 1935 पासून नोकरी सुरू झाले. त्यांनी किती सुखा या चित्रपटात गीतकार म्हणून यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर यश मिळवणाऱ्या पहिला भारतीय चित्रपट संत तुकाराम या चित्रपटासाठी गीतकार म्हणून आठवले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी गीतकार म्हणून केशवराव भोळे यांच्यासोबत अनेकदा संगीत पद्धत काम केले त्यांच्या सहकार्यामुळे कुंकू माझा मुलगा आणि गोपाळ कृष्ण संत ज्ञानेश्वर संत सखु रामशास्त्री या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन केले. 1942 मध्ये प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि देवकी बोस च्या आपल्या घरासाठी संवाद आणि गीत लिहिण्याचे योगदान दिले. 1948 मध्ये भाग्यरेखा या चित्रपटाद्रे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखली शेवग्याच्या शेंगा या चित्रपटासाठी 1956 मध्ये
तिसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. 1960 च्या दशकात त्यांनी भारतीय चित्रपट विभागासाठी माहितीपटांची मालिका बनवली.

शांताराम आठवले

2 मे 1985 रोजी पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, पत्रकार व साहित्यिक बनारसी चतुर्वेदी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 892 मध्ये फिरोजाबाद या ठिकाणी झाला. त्यांनी बारा वर्षे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून काम केले. बनारसीदास यांनी फिजीमध्ये भारतीय वंशाच्या कामगारांच्या दूरदर्शनबद्दल त्यांना जिव्हाळा वाटला त्यामुळे त्यांनी तिथे अनेक वर्ष घालवली त्यांच्या दुधाचे बद्दल विपुल प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलं आणि पर्यावरण सीएफ अँड्रीजच्या हस्तक्षेपामुळे फिजीमधील कराराबद्ध कामगारांची पद्धत औपचारिकपणे 1920 मध्ये संपुष्टात आली. रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारतीच्या हिंदी भावनांच्या स्थापनेविषयी आणि त्या बांधकामाविषयी 1939 मध्ये ते शांतेनिकेतनच्या प्रक्रियेमध्ये संलग्न होते. त्यांनी मार्जवरी सायकल यांच्यासोबत लिहिलेले चार्ल्स फ्रीर अँड्रॉइड्स , अ नारेटिव या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांना भारत सरकारने 1973 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.



2 मे 1998 रोजी पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते यांचे निधन झाले.


2 मे 2001 रोजी मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती यांचे निधन झाले.

2 मे 2011 रोजी ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक याचे निधन झाले.
X X

https://www.insearchofknowledge.org/2024/04/may-1-day-of-special-dinvishesh-1.html
👆
May 1 - Day of Special (Dinvishesh)

मे 1 : दिनविशेष 



XX

https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X






X X
View, Comments and share..

Post a Comment

0 Comments