Subscribe Us

header ads

May 1 - Day of Special (Dinvishesh) मे 1 : दिनविशेष

May 1 - Day of Special (Dinvishesh)

मे 1 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन


1 मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.


कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर साजरा केला जातो.
कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

1 मे महाराष्ट्र दिन: 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्रात चार प्रमुख विभाग व 26 जिल्हे, 229 तालुके ,289 शहरे ,3577 खेडी होती. अस्तित्वात होते. व महाराष्ट्र लोकसेवा आयोग अस्तित्वात आला.


1 मे 1960 रोजी गुजरात राज्याची निर्मिती झाली.


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला त्यांनी 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केले.


             यशवंतराव चव्हाण

1 मे 1962 रोजी महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना केली. कारण महाराष्ट्र शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकशाहीचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून 1961 साली जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कायदा संमत करून हा निर्णय घेतला.

1 मे 1962 पासून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे सोपविली.
X X


1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला याचे मुख्य ठिकाण ओरोस बुद्रुक येथे आहे.

1 मे 1981 ला औरंगाबाद या जिल्ह्यांची पुनर्रचना करून जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.

1 मे 1998 मध्ये इंडोनेशियातील आर्थिक स्थिती तेथील अवर्षणामुळे खालावली .याला जबाबदार म्हणून सुहर्तो विरुद्ध विद्यार्थ्यांनी संप पुकारला व शेवटी सुहार तोडणार पदमुक्त व्हावे लागले.

1 मे 1999 परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.

1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

1 मे 2016 रोजी भारत सरकारने"प्रधानमंत्री उज्ज्वला योजना" ची सुरुवात केली. एक सरकारी योजना आहे या योजनेत दारिद्र रेषेखालील महिलांना 50 दशलक्ष एलपीजी कनेक्शनचे वितरण करण्याची कल्पना करण्यात आली होती. मार्च 2020 पर्यंत आठ कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे स्वयंपाक करताना लाकडी जाळन वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोस्वासाच्या तक्रारी दूर करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा आहे. 21 जुलै 2016 च्या रिपोर्टनुसार एकूण 1766 254 एलपीजी जोडण्या सरकारने दिलेले आहेत.


X X
1 मे 2019 रोजी गडचिरोली येथे पोलिसांवर भुसुरुंगाने हल्ला झाला . यात 15 पोलिस शहीद झाले.

1 मे 1707 रोजी किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.

1 मे 1739 रोजी चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला.

1 मे 1828 मध्ये सातारा येथे सार्वजनिक काका उर्फ गणेश वासुदेव जोशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव जोशी व आईचे नाव सावित्रीबाई जोशी हे होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर हे होते. नोकरीच्या निमित्ताने 1848 मध्ये ते पुण्यात आले व न्यायालयात कारकून म्हणून ते रुजू झाले पण अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी न्यायालयीन कारकून या पदाचा राजीनामा 1856 मध्ये दिला व त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा 1865 मध्ये दिली व ते वकील झाले आणि पुणे येथेच त्यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सुरू केला. सार्वजनिक काका व न्यायमूर्ती रानडे या दोघांच्या पुढाकारानेच सार्वजनिक स्वरुपाची कामे करण्यासाठी बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर त्यांनी 2 एप्रिल 1870 मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या 'सार्वजनिक सभा' या संस्थेचे ते एक प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ होते. त्यांनी स्वतःस या संस्थेच्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतले होते. म्हणून ते 'सार्वजनिक काका' या नावाने प्रसिद्ध पावले. 1873 मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ 1876-77 मध्ये पडला होता. या दुष्काळात लोकांवर अन्नावाचून उपाशी मरण्याची पाळी आली होती. सामाजिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकन्यांना दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या व शेतकऱ्यांना त्या काळात केलेली मदत खूपच मोलाची ठरली. न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी 1972 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला ही स्वदेशी चळवळ त्यांनी लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या अगोदर केलेली स्वदेशी चळवळ होती त्यांनी 12 जानेवारी 1872 रोजी खाली वापरण्याची शपथ घेतली व आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी खाली वापरून आपली शपथ पूर्ण केली.स्वदेशीचे आद्य प्रवर्तक सुद्धा सार्वजनिक काकांना म्हटले जाते.सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 मध्ये पुण्यात 'स्त्रीविचारवती' या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली होती.ब्रिटिशांच्या वेळ खाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना ब्रिटिशांसमोर मांडली व सार्वजनिक काकांच्या प्रयत्नाने पुणे या ठिकाणी 1876 मध्ये ब्रिटिशांनी लवाद न्यायालयाची स्थापना केली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे 1879 मध्ये वकीलपत्र काकांनी स्वीकारले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. वासुदेव बळवंत फडक्यांना त्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.सार्वजनिक काका यांचे निधन हृदयविकाराच्या आजाराने पुण्यात वयाच्या 52 व्या वर्षी 25 जुलै 1880 रोजी झाले.


1 मे 1840 रोजी द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.


1 मे 1844 रोजी हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले. हाँगकाँग हा चीन देशातील एक स्वायत्त प्रदेश आहे 1997 मध्ये हॉंगकॉंग अधिकृतपणे हॉंगकॉंग विशेष प्रशासकीय क्षेत्र पीपल्स पब्लिक रिपब्लिक ऑफ चायना आणि एक विशेष शहर आहे. हे शहर पूर्व पर्ल नदी डेल्टा वर दक्षिण चायना मध्ये आहे. हे जगात सर्वात दाट लोकवस्तीचे ठिकाण आहे आणि जगातील सर्वात विकसित शहर म्हणून ओळखले जाते. येथील भांडवलशाही मिश्र सेवा अर्थव्यवस्था आहे. म्हणजे कमी कर आकारणी किमान सरकारी बाजार हस्तक्षेप आणि एक स्थापित आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजार आहे. येथील जीडीपी सह 35 वी सर्वात मोठी जगातील अर्थव्यवस्था आहे. पर्यटन हा येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे जीडीपी 5% आहे. पर्यटकनासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन येथील 14 वे जागतिक लोकप्रिय पर्यटन आहे. येथील पोलीस दल हाँगकाँग पोलीस फोर्स या नावाने कायद्याची अंमलबजावणी तपास यंत्रणा आणि येथील सुरक्षा ब्युरो अंतर्गत सर्वात मोठी शिस्तबद्ध पोलीस यंत्रणा आहे. त्याचे बोधवाक्य "सन्मान कर्तव्य आणि निष्ठेने हाँगकाँग ची सेवा करणे" असे आहे. ही पोलीस यंत्रणा चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रापासून स्वतंत्र आहे. ती नेहमी स्थानिक कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही. पोलीस अधिकारी नागरी सेवक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस दल नागरी सेवक आणि त्यांचे सागरी क्षेत्र असे एकूण अंदाजे 34000 पोलीस अधिकारी आहेत. 30 एप्रिल 1841 मध्ये ब्रिटिशांनी हॉंगकॉंग मध्ये वसाहती स्थापन केल्यानंतर कॅप्टन चार्ल्स एलियटने वसाहतीत पॉलिशिंग प्राधिकरणाची स्थापना केली. पण अधिकृत या पोलीस दलाची स्थापना 1 मे 1944 रोजी करण्यात आली. 1980 च्या दशकात हॉंगकॉंग पोलिसाने आपले दल आशियातील सर्वोत्तम दल म्हणून घेत होते. या पोलीस दलात आयुक्त हे कमांडर म्हणून काम करतात. या पोलीस दलाचा गणवेश 2005 मध्ये लागू करण्यात आला. त्यांची वाहने बहुतांश पांढऱ्या रंगाची असतात. वाहनाच्या बाजूला निळ्या आणि लाल असतात पांढऱ्या रंगात पोलीस हा शब्द लिहिलेला असतो.


1 मे 1862 रोजी मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
X X
1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

1 मे 1884 रोजी अमेरिकेत कामगारांना एका दिवसात 8 तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

1 मे 1886 रोजी या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.

1 मे 1890 रोजी जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.

1 मे 1927 रोजी जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

1 मे 1930 रोजी सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

1 मे 1940 रोजी युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

1 मे 1926 रोजी पोलियोची लस जनतेस उपलब्ध करून देण्यात आली. पोलिओ किंवा पोलिओ मायलिटीस हा विषाणूपासून होणारा बालकांमध्ये आजार असून तो अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ मायलिटीस हा ग्रीक भाषेतील शब्द आहे म्हणजे ग्रे किंवा भुरा मज्जा रज्जू म्हणजे यावर सूज येणे. हा विषाणू रक्तात गेल्यानंतर त्याचे काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. हा विषाणू मज्जा रज्जू संस्थेत प्रवेश केल्यानंतर शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या गती प्रेरक निरोनना अपाय करतो. याचे पर्यावसण स्नायू दुर्बल होण्यामध्ये होऊन शेवटी पक्षघातामध्ये होते. 1980 नंतर पोलिओच्या साथींचे युरोपमध्ये मोठा उद्रेक झाला. अमेरिकेत लगेच पूर्वीच्या साथीचा प्रसार झाला आणि 1910 पर्यंत जगात पोलिओचा खूपच उद्रेक होऊन या साथीमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या यावर उपाय कारक लस शोधण्यासाठी महा शर्यत जगात सुरू झाली. पोलियेच्या लस विकसित करण्याचे श्रेय जोनस साल्क व अल्बर्ट सेबिन यांना जाते. यांच्या पोलिओच्या लसीमुळे लाखावरून पोलिओ ची संख्या हजारावर आली. जागतिक आरोग्य संघटनेने युनिसेफ व रोटरी इंटरनॅशनल या संस्थांच्या पोलिओ निर्मलनाच्या प्रकल्पामुळे पोलिओचे जगातून लवकरच संपूर्ण उच्चाटन होईल अशी आशा निर्माण झालेली आहे. 2000 मध्ये प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील चीन आणि ऑस्ट्रेलिया असे एकूण 36 देशांमध्ये पोलिओचे निर्मूलन झाले. 2002 मध्ये युरोप संपूर्ण पोलिओमुक्त जाहीर करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून भारत देशाला शंभर प्रतिशत पोलिओमुक्त जाहीर करण्यात आले. भारत सरकारने 1995 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पल्स पोलिओ योजनेमुळे भारत देश संपूर्णपणे पोलिओ मुक्त होऊ शकला. भारतात दोन प्रकारच्या लसीचा वापर केला जातो. साल्क- इंजेक्शन द्वारे आणि सेबीध -तोंडात द्वारे लसीकरण केल्या जाते.



X X
1 मे 1960 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.

1 मे 1960 रोजी गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

1 मे 1961 रोजी क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.

1 मे 1962 रोजी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली.

1 मे 1972 रोजी कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

1 मे 1978 रोजी जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.

1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

1 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

1 मे 1998 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

1 मे 1999 रोजी नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

1 मे 2009 रोजी स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
X X


1 मे 1218 रोजी जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जुलै 1291 मध्ये झाला.


1 मे 1910 रोजी आय.सी.एस चे वरिष्ठ अधिकारी तसचं, भारतातील केरळ आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचा जन्म झाला.

1 मे 1913 रोजी अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 एप्रिल 1973 मध्ये झाला.

            बलराज साहनी 

1 मे 1915 रोजी "अंचल" रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी उपन्यासकर तथा कादंबरीकार कहानी लेखक तथाकथा लेखक यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील फतेपुर येथील किशनपुर या गावी झाला. त्यांचे शिक्षण लखनऊ व नागपूर विद्यापीठातून त्यांनी एमए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. छायावाद तथा स्वच्छंदतावादी काव्यांच्या प्रभावाखाली असलेली त्यांची सुरुवातीची कविता पुढे स्वतंत्र झाली आणि ते प्रेम आणि सौंदर्याचे पूजक बनले. त्यानंतर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे मानवाचे कल्याण सामाजिक विषमता बंडक्रांती हे त्यांच्या कवितेचे विषय नंतर बनले. त्यांचा 1941 मध्ये प्रसिद्ध झालेला किरण वेला आणि 1942 मध्ये करील हे दोन काव्यसंग्रह उल्लेखनीय आणि प्रसिद्ध झाले. त्यानंतर काही काळाने अरविंद बाबू घोष यांचा त्यांच्यावर आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडला आणि ते नंतर तत्व चिंतन पर कविता लिहू लागले. त्यात 1938 चा मधून लिखा 1939 मध्ये अपराधीता 1942 मध्ये लाल चुनर 1954 मध्ये वर्ष तक क बादल
आणि 1957 मध्ये विरामचिन्हे हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. कवितासंग्रहाच्या व्यतिरिक्त तारे आणि ये वे बहु तेरे हे कहानी त्यांच्या प्रसिद्ध झाल्या. चढती धूप नई इमारत उल्का हे त्यांचे उपन्यास. 1952 मध्ये हिंदी साहित्य अनुशीलन हा समीक्षेपर ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध झाला.




                  रामेश्वर शुक्ल

X X
1 मे 1920 रोजी भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक व संगीतकार मन्ना डे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 2013 मध्ये झाला. हिंदी चित्रपट सृष्टीतील 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 21 ऑक्टोबर 2009 ला प्रदान करण्यात आला. एक चतुर नार करके सिंगार चित्रपट पडोसन, ए मेरे प्यारे वतन चित्रपट कबुलीवाला, ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही चित्रपट वक्त, कसमे वादे प्यार वफा सब चित्रपट उपकार, जिंदगी कैसी है पहेली चित्रपट आनंद, तू प्यार का सागर है चित्रपट सीमा हे त्यांचे सुप्रसिद्ध चित्रपट गीत आहेत. हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी मराठी चित्रपटातही गाणी गायली. ग दि माडगूळकर आणि संगीतकार वसंत पवार यांचे वरदक्षिणा या चित्रपटातील "धन धन माला नभ दाटल्या कोसळती धारा" हे लोकप्रिय गीत त्यांनी गायले. त्यानंतर मराठीत गायलेली गीते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, आम्ही जातो आमच्या गावा, चला पंढरीसी जाऊ, जय जय हो महाराष्ट्राचा इत्यादी.






1 मे 1922 रोजी स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये उर्फ मधुकर रामचंद्र लिमये यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1995 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले 1937 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळेस त्यांचा परिचय एसएम जोशी नानासाहेब गोरे गाडगीळ यांच्याशी झाला आणि त्यांच्या प्रभावाने त्यांनी राजकारणामध्ये 18 व्या वर्षी शिक्षण सोडून प्रवेश घेतला. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षाचा तुरुंगवास झाला. 1948 मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारणी व त्यांचे निवड झाली आणि 1949 मध्ये समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली. निवडणुकीमध्ये ते चार वेळा खासदार झाले तेही मुंगेर लोकसभा मतदारसंघ बिहार मधून मूळचे पुण्याचे असून सुद्धा. एकदा त्यांना पराभवासाठी सामना करावा लागला. 1964 मध्ये सोशालिस्ट पार्टी आणि प्रजा सोशालिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली. ते या पार्टीचे संसदीय बोर्डाचे अध्यक्ष झाले. आणि 1973 मध्ये खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या काळात जनता पार्टी कडून बांका लोकसभा मतदारसंघातून ते 1977 मध्ये निवडून गेले. 1957 मध्ये मुंबई मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिले पण त्यांना पराभवाला समोरील जावे लागले. 1982 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी विपुल लेखन केले त्रिमंत्री योजना, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची शंभर वर्ष ,स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, पक्षांतर बंदी नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी इत्यादी मराठी भाषेतील पुस्तके त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याने हिंदी भाषेतील राजनीति का नया मोड, मार्क्सवाद और गांधीवाद, संक्रमण कालीन राजनीति इत्यादी लेखन केले. तसेच इंग्रजीमध्ये "प्राईम मुव्हर्स: रोल ऑफ द इंडिजिव्हाल इन हस्टरी" हे इंग्रजी पुस्तक त्यांचे प्रसिद्ध आहे

                    मधु लिमये

1 मे 1932 रोजी कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म झाला.
            एस. एम. कृष्णा


1 मे 1943 रोजी नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म झाला.

1 मे 1944 रोजी सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी यांचा जन्म झाला.

1 मे 1971 रोजी भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म झाला.
X X

1 मे 1988 रोजी साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या व हिंदी चित्रपट निर्माता अनुष्का शर्मा यांचा जन्म झाला.

1 मे 1888 रोजी ब्रिटीश कालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी प्रफुलचंद्र चाकी यांचे निधन झाले.

1 मे 1945 रोजी जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1897 रोजी झाला होता.

1 मे 1958 रोजी नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन झाले.

1 मे 1972 रोजी कमलनयन बजाज भारतीय उद्योगपती यांचे निधन झाले.



1 मे 1993 रोजी नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत यांचे निधन झाले.

1 मे 1998 रोजी गंगुताई पटवर्धन शिक्षणतज्ञ यांचे निधन झाले.

1 मे 2002 रोजी पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक यांचे निधन झाले.

1 मे 2004 रोजी भारतीय जनता पार्टी तसेच पूर्ववर्ती पक्ष भारतीय जनता संघाचे नेते तसचं, उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल यांचे निधन झाले.

1 मे 2008 रोजी पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानी निर्मला देशपांडे यांचे निधन झाले.


                निर्मला देशपांडे


X
X

https://www.insearchofknowledge.org/2024/04/april-30-day-of-special-dinvishesh.html

👆

April 30 - Day of Special (Dinvishesh)

एप्रिल 30 : दिनविशेष

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

X X

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी

X X
https://www.insearchofknowledge.org/2022/04/10-ssc.html
👆
10 वी.( SSC ) पास विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक व नोकरीच्या संधी



https://www.insearchofknowledge.org/2023/07/ganesh-vasudeo-joshi-sarwajanik-kaka.html
👆
Ganesh Vasudeo Joshi (Sarwajanik Kaka): Lawyer, Social reformer

गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका: कायदे तज्ञ व समाज सुधारक

1 मे : जन्मदिन

XX



👆
May 2 - Day of Special (Dinvishesh)

मे 2 : दिनविशेष




X
X
View, Comments and share...

Post a Comment

0 Comments