Subscribe Us

header ads

June 30 - Day of Special (Dinvishesh)

June 30 - Day of Special (Dinvishesh)

जुन 30 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

30 जून 1965 रोजी भारत पाकिस्तान मध्ये युद्धबंदी रेषा- 24 पॅरलल लाईन ठरवण्यात आली.

१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

१९४४: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.

१९६०: काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
XX
१९६५: भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६६: कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.


१९७१: सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
XX
१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.


१९८६: केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९९७: ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.


२०००: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन(Bill Clinton) यांनी अमेरिकेत डीजीटल हस्ताक्षर करण्यास वैध रित्या परवानगी दिली.
XX
२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१४७०: चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)

१९०३: भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्मदिन.


१९११: साहित्य अकादमी चे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्मदिन.

१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)

१९२८: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
XX

१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.


१९४३: सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

१९६६: माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा

१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
XX
१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८५७: शाही डोगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसचं, ब्रिटीश भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचे निधन.

१९१७: पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

१९१९: नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विलियम्स स्ट्रट रेले(John William Strutt) यांचे निधन.


१९९२: डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक

१९९४: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)


१९९७: राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
XX
१९९९: कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी


२००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)

२००८: भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचे निधन.
XX

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी



XX


XX

XX
View, Comments and share 

Post a Comment

0 Comments