Subscribe Us

header ads

June 28 - Day of Special (Dinvishesh)

June 28 - Day of Special (Dinvishesh)
जुन 28 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

१८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.


१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
XX

१९७२: दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ

१९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९८१: चीनने कैलाश मानसरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला.


१९८६: अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला.
XX
१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.


१९९५: वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.

१९९७: मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.
XX
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४९१: हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

१७१२: रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)


१८८३: साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, हिंदी वृत्तपत्र “दैनिक आज” चे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्मदिन.

१९२१: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

१९२८: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

१९३४: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (मृत्यू: १८ जुलै २००१)
XX
१९३७: डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक

१९७०: मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९७६: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचा जन्मदिन.


१९९५: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालंपिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गावेलु यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८३६: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)
XX
१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.


१९७२: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)

१९८७: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी१९११)

१९९९: रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार

२०००: विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)

२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

२००७: जपानच्या पूर्व पंतप्रधान कीची मियाजावा (Kichi Miyajwa) यांचे निधन.
XX

२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ६ मे १९५५) 

XX



XX

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी



XX

View, Comments and share 

Post a Comment

0 Comments