Subscribe Us

header ads

June 27 - Day of Special (Dinvishesh)

June 27 - Day of Special (Dinvishesh)

जुन 27 : दिनविशेष


महत्त्वाच्या घटना

एच.आय.व्ही. चाचणी दिन: अमेरिका
जागतिक दिनाचे औद्योगिक कामगार (Industrial Workers Of The World Day)

27 जून 1839 रोजी महाराजा रणजीत सिंग यांचा काबुलच्या मोहिमेवर असताना मृत्यू झाला इंग्रज, रणजीत सिंग व शहा सुजा असा त्रिपक्षीय करार घडून आणला होता व त्यानुसार इंग्रजी फौजा काबूलच्या मोहिमेवर पाठविल्या गेल्या. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


१६९३: लंडनमध्ये पहिले महिला मासिक द लेडीज मर्क्युरी प्रकाशित केले गेले.
XX

१९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९५४: अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.


१९६४: साली दिल्ली येथील तीन मूर्तिच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.


१९६७: लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine)सुरू.
XX
१९७७: जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९९६: अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर

१९८१: कंबोडियाने संविधान स्वीकारले.

२००२: परमाणु शस्त्र नष्ट करण्याच्या रशियाच्या योजनेस जी-८ देशांनी आपली सहमती दर्शविली.

२००८: साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.


२०१५: साली संयुक्त राष्ट्र संघाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात विशेष स्थान असणार्‍या सत्यजित रे यांचे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
XX
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४६२: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

१५५०: चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ३० मे १५७४)


१८३८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८६४: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

१८६९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.
XX
१८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)

१८८०: हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)


१८९९: पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)


१९१७: खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)

१९२२: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय तामिळ भाषिक लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, प्रवासी लेखक, नाटककार आणि पटकथा लेखक अकिलन यांचा जन्मदिन.

XX
१९३९: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)

१९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

१९६४: साली पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू पी. टी. उषा यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७०८: धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: १६५०)

१८३९: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१९५७: हर्मन बुहल – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)
XX
१९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१९९८: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

२०००: द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार

२००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

२००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)
XX

 https://www.insearchofknowledge.org/2021/09/career-path-finder-after-12th-science.html

👆

12 बारावी विज्ञान शाखा

12 वी. विज्ञान ( Science ) शाखेतील पास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/07/career-path-finder-after-12th-arts.html

👆

12 वी. कला (Arts) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी उपलब्ध संधी

XX

https://www.insearchofknowledge.org/2021/08/career-path-finder-after-12th-commerce.html

👆

12 वी.कॉमर्स ( Commerce) च्या पास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी




XX


XX

View, Comments and share 

Post a Comment

0 Comments